तपासणीला दप्तर न देणाऱ्या ग्रामसेवकांवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई; आठ निलंबित, पाच पोलीसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील बोदवड, धरणगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी सरकारी दप्तर बेकायदा ताब्यात ठेवले होत. याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ८ ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात आली असून पाच ग्रामसेवकांना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

त्याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून ५ ग्रामर्सेवकांना जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आले आहे. तसेच इतर दोन ग्रामसेवक कर्तव्यात गैरहजर आढळून आले असून त्यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातील एकूण ८ ग्रामसेवक यात राहुल नारायण पाटील (चिंचखेडा सिम बोदवड जि.जळगाव), सुभाष रामलाल कुंभरे ,ग्रामसेवक (धौडखेडा ता.बोदवड जि . जळगाव), सुरेश दत्तात्रय राजहंस ग्रामसेवक ग्रामपंचायत (वरखेडता. बोदवड जि. जळगाव), गणेश रामसिंग चव्हाण ग्रामसेवक ग्रामपंचायत (जुनोने दिगर ता. बोदवड जि. जळगाव ), राहुल नारायण पाटील, ग्रामसेवक (ग्रामपंचायत आमदगाव, ता. बोदवड जि. जळगाव), नंदलाल किसन येशीराया ग्रामसेवक ग्रामपंचायत (लोंजे ता. चाळीसगाव जि. जळगाव) आदी यांच्यावर कारवाई केली आहे. जिल्हापेठ पोलीस निरीक्षक विलास शेंडे व पीएसआय प्रदीप चांदेलकर, पो.काँ. योगेश ठाकुर, नरेंद्र दिवेकर, होमगार्ड मधुकर मोरे,स्वप्निल सपके,प्रशांत शिंपी या पोलीस पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ८ ग्रामसेवकांवर कारवाई झाल्याचा महाराष्ट्रातील पहिलाच खटला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ८ पैकी कर्तव्यावर गैरहजर असलेले विनायक चुडामण पाटील, ग्रामसेवक ग्रामपंचायत (झुरखेडा ता. धरणगाव जि. जळगाव), अनिल कचरू जावळे ग्रामसेवक ग्रामपंचायत (डोणगाव ता. धरणगाव जि. जळगाव) हे दिसून आले आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

Protected Content