लाचखोर बँक अधिकार्‍याला एक दिवसाची कोठडी

जळगाव प्रतिनिधी । ट्रॅक्टरच्या थकलेल्या कर्जामुळे जप्तीचा धाक दाखवून २० हजारांची लाच मागणार्‍या प्रशांत विनायकराव साबळे या बँक वसुली अधिकार्‍याला न्यायालयाने एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील लोंढे येथील एका शेतकर्‍याने देना बॅकेतून ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जाचा एकही हप्ता राणे यांनी भरला नव्हता. त्यामुळे कर्ज वसुली अधिकारी प्रशांत साबळे यांनी कर्जदार शेतकर्‍याला ट्रॅक्टर जप्तीची भिती दाखवली. त्यानंतर ट्रॅक्टर जप्त न करण्यासाठी दहा हजाराची मागणी साबळे यांनी केली. यानंतर त्याने कर्जाची रक्कम कमी करुन देतो असे म्हणत पुन्हा वीस हजार रुपयांची मागणी त्यांनी केली. त्यानंतर तक्रादार शेतकर्‍याने या प्रकाराची पुणे सीबीआय अंतर्गत एसीबी कार्यालयात तक्रार केली होती.

या अनुषंगाने एसीबीचे पोलिस निरिक्षक महेश चव्हाण यांनी १९ जानेवारी रोजी विस हजार रुपयांची लाच घेतांना बँक वसुली अधिकारी प्रशांत साबळे यास रंगेहाथ पकडले. त्यास अटक करण्यात आली. त्याला आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला एक दिवस कोठडी सुनावण्यात आली.

Protected Content