दहा लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शनीपेठ येथील माहेर व भडगाव येथील सासर आलेल्या विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी १० लाख रूपये आणावे आणि मुलबाळ होत नाही म्हणून शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक महिती अशी की, ईश्वरी राहुल सुर्यवंशी (वय-३२) रा. भडगाव. ह.मु.शनीपेठ जळगाव यांचे भडगाव येथील राहुल सुर्यभन सुर्यवंशी यांच्याशी २०१३ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले. लग्न झाल्यापासून आतापर्यंत त्यांना मुलबाळ झाले नाही. या कारणावरून पती राहुल सुर्यवंशी यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. याला सासू सुमनबाई सुर्यवंशी, जेठ महेंद्र सुर्यवंशी, ननंद अनिता अशोक महाजन, नंदोई अशोक बाबुराव महाजन यांनी देखील टोचून बोलणे व शिवीगाळ केली. हा अत्याचार असह्य न झाल्याने विवाहितेने जळगावातील आई-वडीलांना हकीकत सांगितली. पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह इतर चार जणांना शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि अमोल कवळे करीत आहे.

Protected Content