कोराना : बाधित रूग्ण होताहेत बरे; आतापर्यंत १५ रूग्णांना मिळाला डिस्चार्ज

मुंबई वृत्तसंस्था । एका बाजूने कोरोनाच्या कहरने सर्वांना घरात थांबावे लागत आहे. मात्र दुसरीकडे आत कोरोना बाधित रूग्ण बरे होत असून आतापर्यंत १५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटवरून माहिती दिली आहे.

आज मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या १२४वर गेली आहे. राज्यात रोज करोनाचे रुग्ण आढळत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. करोनामुळे बरे झालेल्यांमध्ये पुण्यातील दोन दाम्पत्यांसह मुंबई आणि औरंगाबादमधील रुग्णांचाही समावेश असल्याचं टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, राज्यात मुंबई शहर आणि उपनगर ५२, पिंपरी चिंचवड मनपा १२, पुणे मनपा १९, नवी मुंबई ५, कल्याण ५, नागपूर ४, यवतमाळ ४, सांगली ९, अहमदनगर ३, ठाणे ४, सातारा २ आणि पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई-विरारमध्ये प्रत्येकी एक करोना रुग्ण आढळला आहे. तर राज्यातील करोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या चारवर पोहोचली आहे.

Protected Content