Home धर्म-समाज आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी किरणकांत जोगी

आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी किरणकांत जोगी

0
34

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील आरोग्य सुपरवायझर किरणकांत जोगी यांची संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

सचिव म्हणून लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक दिपक दिक्षीत यांची वर्णी लागली आहे. तर संघटनेचे उपाध्यक्ष आशा संभाजी दराडे, योगेश जयवंत पाटील, सहसचिव योगिता पांडुरंग खैरनार, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र लालू चव्हाण, सदस्य शोभा रामदास आमोदे, प्रगती अशोक दुर्गे, माया संदिप सोनवणे, वैशाली भाईदास चव्हाण, ज्ञानेश्वर भिमराव चव्हाण, लेखा व्यवस्थापक जगन्नाथ नामदेवराव पाटील यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी अभिनंदन केले आहे.

 


Protected Content

Play sound