वरणगाव वैद्यकीय अधिक्षकांकडून कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धाने सन्मान

वरणगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर क्षितीजा हेंडवे यांनी कोरोना योद्धा म्हणून गौरव केला आहे.

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली आहे. भुसावळ तालुक्यांमध्ये ही कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात सापडली होती. वरणगाव शहरालाही याचा खूप मोठा धोका पत्करावा लागला आहे. या रुग्णसेवेसाठी वरणगावातील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कोरोना रुग्णांची देखभाल केली आहे. त्याच बरोबर लसीकरण मोहीम हे चांगल्या पद्धतीने या रुग्णालयात केली जात आहे. आत्तापर्यंत साडेबारा हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आलेले आहे. म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर क्षितीजा हेंडवे त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केलं. 

यावेळी डॉ अविनाश सुरवाडे डॉ. प्राजक्ता तळेले अधिपरिचारिका सुनीता केदारे, अर्चना वासनिक, पल्लवी सुरवाडे, शितल बोदडे, प्रीती आराक, मोहिनी सपकाळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ भोजराज लोखंडे, सहाय्यक दिलीप गायकवाड, वरिष्ठ लेखापाल महेंद्र सोनवणे, कनिष्ठ लेखापाल आकाश इंगळे, एक्स-रे टेक्निशियन उदय बोंडे, आयसीटी समुपदेशक ज्योती गुरव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ भावना प्रजापति, रोहिणी शिरसाट, करुणा चव्हाण, सुनिता कोल्हे, वर्षा मोरे, जनार्दन वाघ, इरफान पठाण, कल्पेश तायडे, भारती निकम, माधुरी चंदिले आदी कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयसीटीसीच्या समुपदेशक ज्योती गुरव यांनी केले.

https://www.facebook.com/508992935887325/videos/1814481638713810

 

Protected Content