अनिल चौधरींचा शिवसेनेला ‘दे धक्का’; पदाधिकारी प्रहारमध्ये दाखल !

रावेर प्रतिनिधी । भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे प्रहार जनशक्ती पक्षात दाखल होताच या पक्षात इनकमींग सुरू झाले असून आज युवासेनेच्या विभागीय प्रमुखांसह त्यांचे समर्थक या पक्षात दाखल झाले आहेत.

युवासेनेचे विभागीय युवा प्रमुख अविनाश पाटील यांनी समर्थकांसह आज अकोला येथे प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा पार पडला.

याप्रसंगी अविनाश पाटील यांच्यासह यात तामसवाडी सरपंच नरेंद्र कोळी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष शिवसेना शेख लतीफ, युवासेना शहरप्रमुख रावेर मनोज वरणकर, शिवसेना शाखाप्रमुख निंभोरासिम प्रवीण चौधरी, उपशाखाप्रमुख शिवसेना गौरव पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक शाखाप्रमुख विशाल पाटील, भूषण धनके, राजेंद्र पाटील, लीलाधर राजपूत, जीवन जाधव, जय राजपूत, भगवान कोळी निंबोल व इतरांनी प्रहार जनशक्तीमध्ये प्रवेश घेतला. या माध्यमातून अनिल चौधरी यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्याचे मानले जात आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!