Home क्राईम लेआऊट मंजुरीच्या प्रकरणात १० हजारांची खंडणी घेतल्याचा आरोप; गुन्हा दाखल

लेआऊट मंजुरीच्या प्रकरणात १० हजारांची खंडणी घेतल्याचा आरोप; गुन्हा दाखल

0
1


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील एका प्लॉटच्या लेआऊट मंजुरीसंदर्भात माहितीच्या अधिकाराचा अर्ज मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर येथील डॉ. शब्बीर कदीर शेख यांनी गट क्रमांक 1154 मधील प्लॉटचा लेआऊट मंजुरीसाठी नगरपरिषदेकडे अर्ज केला होता. हा लेआऊट मंजूर होऊ नये यासाठी गयासउद्दीन सदरोद्दीन काझी (रा. कोतवाल वाडा, रावेर) यांनी विविध शासकीय कार्यालयांमध्ये माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज दाखल केले होते.

फिर्यादीनुसार, हे अर्ज मागे घेण्यासाठी काझी यांनी सुरुवातीला पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम तीन लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. त्यानुसार 16 मे रोजी अश्विनी मेडिकल येथे आणि 23 मे रोजी ज्ञानछाया डिस्ट्रीब्युटर्स येथे प्रत्येकी 5 हजार रुपये असे एकूण 10 हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे.

तसेच उर्वरित रक्कम न दिल्यास मेट्रो हॉस्पिटल व मेडिकलविरोधात खोट्या तक्रारी करून व्यवसाय बंद पाडण्याची तसेच व्हॉट्सअॅपवर बदनामी करण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी डॉ. शब्बीर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात गयासउद्दीन काझी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार असून, पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.


Protected Content

Play sound