Home क्राईम प्रापर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा खून : परिसरात उडाली खळबळ !

प्रापर्टीच्या वादावरुन भावाच्या शालकाचा खून : परिसरात उडाली खळबळ !

0
3


पाचोरा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरात ८ जुन रोजी रात्रीच्या सुमारास प्राॅप्रटीच्या वादावरुन शाब्दिक चकमक होवुन या वादाचा परिणाम थेट खुनात होवुन सख्ख्या भावाच्या शालकाचा खुन झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मारेकरी स्वतः हुन पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.

याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार पाचोरा शहरातील संतोष हरलाल कानडे (वय – ५५) हिंद आॅईन मिल जवळ सख्ख्या भावाच्या शालकास त्याचे भावाचा शालक यांचेशी घराच्या आर्थिक व्यवहारावरुन वारंवार वाद सुरू होते‌. या घटनेचा थेट परिणाम खुनात होवुन ८ जुन रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शहरातील जामनेर रोडवरील कन्या शाळेजवळ संतोष कानडे याने दिपक प्रकाश कानडे (वय – ४०) कोंडवाडा गल्ली, ता. पाचोरा यास चाकुने भोसकले.

या भयंकर घटनेत दिपक कानडे यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर संतोष कानडे हा स्वतःहुन पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संतोष कानडे याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound