
अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आज सकाळी अमळनेर ते धुळे रोडवर असलेल्या मंगरूळ गावाजवळ तीन वाहनांचा विचीत्र अपघात झाला. यात अमळनेरहून धुळेमार्गे चाळीसगाव येथे जाणाऱ्या एम एच १३ सी यु ७५४० या क्रमांकाच्या बसने मोटरसायकल क्रमांक एम एच १८ सी ८७१९ तसेच जी जे १९ ,एएफ ३१४७ या क्रमांकाच्या कारची टक्कर झाली. या अपघातात मोटारसायकल आणि कारचा चेंदामेंदा झाला.
या भीषण अपघातात कारमधील पाच जण तर मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातात मयत झालेले पाच जण हे गुजरातमधील व्यारा येथून अमळनेर येथे येत होते अशी माहिती मिळाली आहे. तर, मोटारसायकलस्वार हा धरणगाव तालुक्यातील असल्याचे समजचे.
दरम्यान, या अपघातात चारचाकीमधील एक मुलगा बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.



