संचारबंदी : खासगी वसतीगृह,  घरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे घर भाडे माफ करण्याची मागणी

बोदवड, प्रतिनिधी । आज देशावर कोरोना विषाणूचे संकट ओढवले आहे. याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाकडून देशभरात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीमुळे जळगाव येथे शिक्षणासाठी आलेले बाहेरगावाचे विद्यार्थी हे खासगी वसतिगृह किंवा खासगी रूम करून राहत आहेत अशा विद्यार्थ्यांकडून घर मालकाने भाडे मागू नये अशी मागणी इंजि.चेतन प्र.तांगडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

जळगाव हे विद्यापीठाचे ठिकाण,असंख्य मोठी महाविद्यालये शहरात आहेत. या सर्वच महाविद्यालयात बाहेर गावावरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जळगाव जिल्हा हा प्रामुख्याने शेती व त्या अनुषंगाने आधारित उद्योगांवर चालणार जिल्हा आहे. शहराच्या ठिकाणी शिकायला येणारे सर्व विद्यार्थी हे साधारण सर्व शेतकरी पाल्य आहेत. बंदमुळे सर्वांवरच उदरनिर्वाहाचे संकट येऊन ठेपले आहे. अशा या परिस्थितीत जे विद्यार्थी जळगाव शहरात खासगी वसतिगृहात किंवा खासगी रूम करून राहतात आशा सर्व विद्यार्थ्यांकडून वसतिगृह मालक व घर मालक यांनी भाडे आकारू नये असे पत्रक काढण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Protected Content