गोदावरी महाविद्यालयात एमबीए इंडक्शन प्रोग्राम उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव व्यवस्थापन महाविद्यालयातील एमबीए शाखेचा इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता.

नुकतीच एमबीएची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आणि कॉलेज सुरू झाले आहे. सदर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांना संबोधताना डॉ. प्रशांत वारके बोलले की, लोकांसोबत व लोकांकडून काम करून घेणे म्हणजे मॅनेजमेंट. जीवन म्हणजे क्षमता व अपेक्षा यांचा खेळ आहे. यासाठी विद्यार्थ्याने संभाषण कौशल्य,  सामान्य ज्ञान इत्यादी वाढविले पाहिजे जेणेकरून कंपनी तुम्हाला तुमच्या कौशल्यानुसार चांगल्या पदावर नियुक्ती देईल. जर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर त्यासाठी लागणारी गुणवत्ता तुमच्याकडे पाहिजे. संभाषण कौशल्यावर जास्त भर द्या. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणे म्हणजे टीम वर्कचा अनुभव करणे. त्यामध्ये तुम्हाला Co-ordination, Leadership इ. सारखे कौशल्य विकसित करण्यात मदत होते. ‘Leaders always have value’  असे त्यांनी आवर्जून विद्यार्थ्यांना सांगितले.  यावेळी डॉ. प्रशांत वारके यांनी गोदावरी फौंडेशन बद्दल माहिती दिली. तसेच व्यवस्थापन महाविद्यालयाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

महाविद्यालयाच्या पप्राध्यापिका डॉ. नीलिमा वारके यांनी विद्यार्थ्यांना एमबीएच्या नवीन अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली.

सदर कार्यक्रमात दुसऱ्या सत्रात मॅनेजमेंट गेम घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा राणे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमास प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ह्या कार्यक्रमास सोशल डिस्टन्सचे पालन  करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास  तांत्रिक हाताळणी मयुर पाटील यांनी केली.

यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा.चारुशीला चौधरी, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक व दिपक दांडगे, मयुर पाटील, योगेशराज नेतकर,  गौरव पाटील, गणेश सरोदे, सागर चौधरी, रुपेश तायडे, प्रशांत किरंगे, प्रफुल्ल भोळे, जीवन पाटील, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, जयश्री चौधरी, भावना ठाकूर  यांची उपस्थिती होती.

 

Protected Content