करिअर निवडतांना पोलीस विभागाचा प्रामुख्याने विचार करा – पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | विद्यार्थ्यांना करिअरची निवड करीत असताना पोलीस विभागाचा विचार प्रामुख्याने करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलीस दल, भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शस्त्र, बिनतारी संदेश यंत्रणा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक, पोलीस बॅण्ड आदींच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

डॉ. मुंढे यांनी महाराष्ट्र पोलीसांचा इतिहास, कार्यपद्धती, प्रमुख उपलब्धी इ. विषयी सविस्तर माहिती सांगितली. व त्यांनी देश सेवा करण्यासाठी पोलीसाची नोकरी सुवर्णसंधी असल्याचे सांगितले. सर्व शासकीय विभागांच्या पाठीशी पोलीस विभाग सदैव आहे याची जाणीव त्यांनी करून दिली.
या प्रदर्शनाला शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील २ हजार १४२ विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी पिस्तुल पासून ए.के. 47 पर्यंतची शस्त्र हाताळली. पोलीसांनी देखील बेवारस वस्तू आणि सदृश्य वस्तूबाबत काय काळजी घ्यायला हवी याबद्दल माहिती दिली. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी केले. यानंतर भगीरथ शाळेतील इ. ४ थी चा विद्यार्थी सात्विक भोंबे व विद्या इंग्लीश मिडीयम शाळेच्या इ. ९ वी चा विद्यार्थी शंतनू शिंदे यांने यांनी मान्यवरांच्या समोर आपले अनुभव मांडले. यानंतर युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया व पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पिस्तुल, बंदूक, रायफल आदी चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.

 

कार्यकमाचे सूत्र संचालन अमित माळी यांनी केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता तरी पोलीस अधिक्षक डॉ. मुंढे यांनी विद्यार्थ्यांना सर्व नियमांचे पालन करून सदर संधी उपलब्ध करून दिली म्हणून विराज कावडीया यांनी पोलीस अधिक्षक डॉ. मुंढे यांचे आभार मानले.

यावेळी विद्यार्थ्यांना 9 mm पिस्टल, एस.एल.आर. रायफल, इन्सास, ए.के. 47, ग्लॉक, कार्बाईन, रिव्हॉल्व्हर, थ्री नॉट थ्री, पंप ॲक्शन, टिअर गॅस इ. शस्त्रांची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी श्वान पथकातील लॅबरेडॉर, जर्मन शेफर्ड, डॉबरमन ब्रीड चे श्वान उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अघिक्षक डॉ. प्रविण मुंढे व भगीरथ शाळेचे विद्यार्थी सात्विक भोंबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, पोलीस उप अधिक्षक (गृह) विठ्ठल ससे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, लिलाधर कानडे, रामदास वाकोडे, रामकृष्ण कुंभार, प्रतापराव शिकारे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस आरएसआय भरत चौधरी, मंगल पवार, एएसआय राजेश वाघ, देविदास वाघ, हेडकॉन्स्टेबल सोपान पाटील, हरीष कोळी आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली भेट :
या प्रदर्शनाला विद्या इंग्लीश मिडीयम स्कूल, भगिरथ शाळा, डॉ. अविनाश आचार्य शाळा, रूस्तमजी इंटरनॅशनल, उज्वल स्प्राऊटर इंटरनॅशनल, मूळजी जेठा महाविद्यालय, ए. टी. झांबरे विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, भूषण सोनवणे, सयाजी जाधव, पियुष हसवाल, उमाकांत जाधव, भवानी अग्रवाल, अर्जून भारूळे, प्रशांत वाणी, सौरभ कुळकर्णी, सागर सोनवणे, भटू अग्रवाल, वेदांत दुसाने, संजना नाईक, संस्कृती नेवे, गायत्री कलाल, दिनेश पाटील, गोकूळ बारी, तेजस शिरूडे, संदिप सुर्यवंशी, सागर सोनवणे, प्रसन्न जाधव, अजय खरात इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचे अनमोल सहकार्य लाभले.

भाग १

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/681189693261690

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/394407025812151

Protected Content