भारतीय जनता पक्षा जिल्हा ग्रामीणची विविध विषयांवर व्हर्च्युअल बैठक

 

जळगाव, प्रतिनिधी  । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची आज रविवार दि. ११ एप्रिल  रोजी माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित  व्हर्च्युअल बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.  

जळगाव जिल्हातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काय उपाययोजना करता येईल या संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हातील आमदार खासदार व प्रमूख पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून भाजपा जळगाव जिल्हात प्रत्येक तालुक्यात भाजप कार्यर्त्याची एक टीम तयार केली जाणार आहे. ही टीम जिल्हातील कोरोना संदर्भात असलेल्या अडचणी (बेड,व्हॅटिलिटर, ऑक्सिजन, इंजेक्शन) संदर्भात काम करतील. त्याच बरोबर लसीकरणासाठी जनजागृती करणार आहे.व जनतेने टेस्ट करून घ्यावी असे आवाहन सुद्धा केले आहे. 

तसेच दि. १४  एप्रिल महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी संपूर्ण जिल्हाभरात मेणबत्त्या व प्रत्येक कार्यकर्यांच्या घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करणार आहे.या  बैठकीला जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे , खा.रक्षा खडसे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ, आ.संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, सरचिटणीस सचिन पानपाटील, मधुकर काटे, हर्षल पाटील, उपाध्यक्ष नंदू महाजन, अजय भोळे, राकेश पाटील, महेश पाटील, पद्माकार महाजन, के.बी. दादा, रेखा चौधरी, डी. एस.चव्हाण , शैलजा पाटील, चिटणीस राजेंद्र चौधरी, सविता भालेराव, रंजना नेवे , जिल्हातील सर्व जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्य- सभापती  उपस्थिती होते.

 

Protected Content