Home Cities जळगाव डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘समन्वय २०२६’चा दिमाखदार समारोप

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘समन्वय २०२६’चा दिमाखदार समारोप


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या ‘आग्नेय’ बॅचतर्फे आयोजित ‘समन्वय २०२६’ या वार्षिक सांस्कृतिक सप्ताहाचा थाटामाटात समारोप झाला. १२ ते १८ एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या या उत्सवात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचे अविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

सप्ताहाची सुरुवात १२ एप्रिल रोजी ‘आर्ट गॅलरी’ने झाली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिक्षक दिन आणि डीजे नाईट यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या समारोप प्रसंगी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, अनिल पाटील, किवा पाटील, सारा पाटील यांच्यासह वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित आणि रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, धन्वंतरी पूजन आणि स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारोपाच्या कार्यक्रमाला चार चाँद लावले. यामध्ये भरतनाट्यम, कथ्थक, लावणी, पंजाबी नृत्य, रेट्रो आणि बॉलीवूड डान्ससह विविध लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच, भावेश गायन, मेशअप, मराठी हिट्स आणि सामाजिक संदेश देणाऱ्या पथनाट्यांनी (स्किट) उपस्थितांना खिळवून ठेवले. तांडव, हिप-हॉप आणि दक्षिण भारतीय नृत्याद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचा कसदार अविष्कार घडवला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तल्हा जमादार, राजनंदिनी पाटील, अंजली महाजन आणि साक्षी पिसे यांनी केले. ‘समन्वय २०२६’च्या यशस्वी आयोजनासाठी वैष्णवी वानखेडे, ओंकार शेलार, कल्याणी चौधरी, अपूर्व पाटील, मुस्कान सिद्दीकी, रुत्विक भुजबळ, वेदांत काकडे, अंजली गुप्ता, चेतन माळी, विराज पाटील आणि सृष्टी माहुलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. वैद्यकीय शिक्षणासोबतच सांस्कृतिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे दर्शन या सप्ताहातून घडले.


Protected Content

Play sound