पहूर येथे महाविकास आघाडीची ‘खोके होळी’ !

पहूर. ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे महाविकास आघाडीतर्फे राज्य सरकारचा निषेध म्हणून खोक्यांची होळी करण्यात आली.

पहूर शहर महाविकास आघडी च्या वतीने खोक्यांची होळी करण्यात आली. याप्रसंगी राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणा बाजी देखील करण्यात आली. या प्रसंगी महाविकास आघाडीचे नेते तथा माजी जि.प कृषी सभापती प्रदिप लोढा ,पहूर पेठ चे उपसरपंच श्याम सावळे, शिवसेनेचे जेष्ठ नेते सुकलाल बारी, राष्ट्रवादी युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश पाटील, रमेश पाटील, पत्रकार गणेश पांढरे, संजय तायडे, ज्ञानेश्वर करवंदे ,अशोक जाधव ,ग्रा सदस्य ईश्वर बारी, इरफान भाई, कॉंगेस पक्षाचे रवींद्र पांढरे, भाऊराव गोधनखेडे, सुभाष पाटील, राजू पाटील, तोफिक तडवी ,दगडू पाटील, कृष्णा पांढरे, नितीन पाटील, दिपक लोढा ,किशोर बारी व महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content