कोरोना आज दमला; तरीही फणा उगारलेलाच

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आज ७४२ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यात जळगाव शहरासह पारोळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला दिसून येत आहे. तर आढळून आलेल्या बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणारे रूग्ण आजही अधिक असल्याचे अहवालातून दिसून येत आहे.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१९६; जळगाव ग्रामीण-१०; भुसावळ-६०; अमळनेर-५६; चोपडा-५८; पाचोरा-१०; भडगाव-२; धरणगाव-४३; यावल-२१; एरंडोल-७, जामनेर-२५; रावेर-२३; पारोळा-११५; चाळीसगाव-६४; मुक्ताईनगर-१८, बोदवड-२४ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १० असे एकुण ७४२ रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-९७१४, जळगाव ग्रामीण-२२०६; भुसावळ-२६०१; अमळनेर-३८२९; चोपडा-३६३१; पाचोरा-१६८७; भडगाव-१६७२; धरणगाव-१९२४; यावल-१४०८; एरंडोल-२५९९, जामनेर-३५०७; रावेर-१७८०; पारोळा-२१९९; चाळीसगाव-२८१५; मुक्ताईनगर-११५६, बोदवड-६९९ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ३२४ असे एकुण ४३ हजार ३०१ रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ४३ हजार ३०१ इतकी झालेली आहे. यातील ३२ हजार ३३६ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८३३ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १९ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १०८० इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ८८५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content