शिवजयंती शांततेत साजरी करा – पो.नि. धनवडे

yawalpolice

यावल प्रतिनिधी । शिवजयंती साजरी करतांना इतर कुठल्याही धर्म किंवा जाती समाज बांधवांच्या भावना दुखावणार नाही आणी कायदा सुव्यवस्थेचे व शिस्तीचे काटेकोर पालन कसे करता येईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.

आपले दैवत जाणते राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतांना तरूणांनी त्यांच्या विचारांना आत्मसात करावे आणी इतर धर्मातील समाज बांधवांमध्ये छत्रपती राजांबद्दल अधिक आदर निर्माण होईल व आपण साजरी केलेल्या आदर्श शिवजयंतीचे इरांनी अनुकरण करावे अशी जयंती साजरी करावी, असे शिवजयंती निमित घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करतांना पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी व्यक्त केले.

यावल येथील पोलीस स्टेशनच्या परिसरात आज १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संपन्न झालेल्या शिवजयंतीनिमित आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत शहरातील आणी ग्रामीण क्षेत्रातील तरूणांना कायदा सुव्यवस्था आणि आगामी येणाऱ्या विविध सामाजीक कर्तव्य मार्गदर्शन करतांना पोलीस निरिक्षक अरुण धनवडे हे बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे यावल शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी गोपाळसिंग पाटील, तरूण शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.

Protected Content