यावल महाविद्यालयात निबंध व रांगोळी स्पर्धेत रिजवाना तडवी प्रथम

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्त्री-पुरुष समानता या विषयाअंतर्गत आभासी निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेत रिजवाना तडवी (एफ.वाय.बी.एस्सी.) हिने प्रथम क्रमांक पटकवला आहे.

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्त्री-पुरुष समानता या विषयाअंतर्गत आभासी निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

निबंध स्पर्धेत प्रथम- कु. रिजवाना हबीब तडवी (एफ.वाय. बी.एस्सी.) द्वितीय-  कु. तबस्सुम रज्‍जाक तडवी (टी. वाय. बी. कॉम) तर तृतीय – कु. प्रीती दिलीप निळे (एस. वाय. बी. एस्सी) क्रमांक मिळविला.  या स्पर्धेत एकूण १६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, तसेच लैंगिक समानता व स्त्री-भ्रूण हत्या या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात प्रथम क्रमांक- कु. धनश्री कैलास पाटील (एफ. वाय. बी. एस्सी), द्वितीय क्रमांक कु. विजया संजय पाटील (एफ. वाय. बी  एस्सी) तर तृतीय क्रमांक- कु. सुवर्णा किशोर सपकाळे (एफ. वाय. बी. ए.) हिने मिळविला.

स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आर. डी.पवार यांनी केले. परीक्षक म्हणून मराठी विभाग प्रमुख डॉ. सौ. सुधा खराटे व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एस. पी. कापडे  यांनी काम पाहिले. स्पर्धेचे यशस्वितेसाठी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए. पी.पाटील, प्रा. संजय पाटील, प्रा. एस. आर. गायकवाड, डॉ. एच. जी. भंगाळे, डॉ. पी.व्ही.पावरा, मिलिंद बोरघडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Protected Content