हंबर्डी येथे उसनवारीच्या पैश्यांवरून तरूणाला बेदम मारहाण; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) । उसनवारीने पैसे न दिल्याच्या कारणावरून तिघांनी तरूणाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना यावल तालुक्यातील हंबर्डी येथे घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, महेश सूपडू सावकारे (वय-३०)  रा. हंबर्डी ता. यावल जि.जळगाव हे २४ ऑक्टोबर रोजी तडवी वाड्यात गप्पा मारत असतांना गावातील सलदार बलदार तडवी हा येवून महेशकडे उसनवारीने पैसे मागितले. दरम्यान महेशने पैसे देण्यास नकार दिल्याने सलदार बलदार तडवी, शावखॉ लालखॉ तडवी आणि लुकमान शावखॉ तडवी तिघे रा. हंबर्डी ता. यावल यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात महेश यांच्या हाताल जबर दुखापत झाली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ देवीदास सरदास करीत आहे.

Protected Content