उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शनिवारी जिल्हा दौर्‍यावर

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे शनिवारी एक दिवसाच्या जिल्हा दौर्‍यावर येत असून यात विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत.

 

गेल्या अनेक दिवसांपासून ना. उदय सामंत यांच्या दौर्‍याच्या नियोजनाची तयारी सुरू असतांना प्रशासनाला आज त्यांच्या दौर्‍याचा अधिकृत तपशील प्राप्त झाला आहे. यानुसार शनिवार दिनांक २६ रोजी उदय सामंत हे सकाळी विमानाने जळगावात येणार आहेत. ते प्रारंभी ९.२० वाजता दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल या संस्थेला भेट देणार आहेत. यानंतर ते शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत.

सकाळी साडेदहा वाजता ना. उदय सामंत हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर अकरा वाजता ते विद्यार्थी आणि प्राध्यपकांसोबत संवाद साधतील. यानंतर ते विद्यापीठातच उच्च व तंत्र शिक्षण @ जळगाव या अभिनव कार्यक्रमास उपस्थित राहतील. हा कार्यक्रम सिनेट हॉलमध्ये होणार आहे. LiveTrends News तेथेच दुपारी एक वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. यानंतर ते विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे दिवंगत नेते रमेश डोंगर शिंदे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीला जाणार आहेत. दुपारी सव्वा दोन वाजता ते युवासेनेच्या युवा संवाद या जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर दुपारी तीन वाजता ते जिल्हा ग्रंथालय नूतन इमारतीच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. सायंकाळी साडेचार वाजेच्या विमानाने ते मुंबई येथे रवाना होणार असल्याचे त्यांच्या दौर्‍याच्या कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content