नितीन गडकरी यांना धमकी देणार्‍याचे टेरर कनेक्शन

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या जयेश पुजारी उर्फ शाकीरचे संबंध जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्याशी असल्याचं समोर आलं आहे.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात जयेश पुजारी उर्फ शाकीर याला अटक करण्यात आली आहे. त्याने गडकरींना दोन वेळा धमकी दिली होती. त्याचे संबंध जम्मू-काश्मीरमधील कुख्यात दहशतवादी बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा सोबतही होते, असं तपासात समोर उघडकीस आलं आहे. नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात जानेवारी आणि मार्च महिन्यात जयेश पुजारीने धमकी दिली होती.केंद्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

 

जयेश पुजारी चे बशुरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा या कुख्यात दहशतवाद्यासोबतच्या संपर्काचे काही ठोस पुरावे नागपूर पोलिसांना मिळाले आहेत. नागपूर पोलिसांनी गडकरी यांच्या कार्यालयात दिलेल्या धमकी प्रकरणी जयेश पुजारी विरोधात आधीच युएपीए अंतर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत. त्याच गुन्ह्यांमध्ये बशुरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशाला सहआरोपी बनवण्यात आले आहे. सध्या बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा बेळगावच्या हिंदलगा तुरुंगात असून त्याला लवकरच नागपुरात आणले जाणार आहे.

Protected Content