शिरसोली रोडवर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोली रोडवर असलेल्या सेंट टेरेसा स्कूलजवळ भरधाव चारचाकी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जखमी झाल्याची घटना बुधवार २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बापू दौलत सोनवणे (वय ४५)आणि त्यांचा सहकारी चंद्रकांत विठ्ठल मोरे दोन्ही रा. राजमालती नगर, दुध फेडरेशन जवळ, जळगाव हे दोघे आचारीचे काम करतात. २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकी (एमएच १९ एमएच ९३४०)ने शिरसोलीकडून जळगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात बापू सोनवणे आणि चंद्रकांत मोरे हे दोघेजण जखमी झाले. दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर दुपारी ३ वाजता दोघांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चारचाकी वाहन चालका विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहे.

 

Protected Content