मुलींनी स्वत:चे जग निर्माण केले पाहिजे…! – अरविंद जगताप

जळगाव, प्रतिनिधी । येथील डॉ. अण्णासाहेच जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या कला मंडळाचे उद्घाटन चला हवा येवू दया या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काका वाचतात, त्या गाजलेल्या पत्रांचे लेखक प्रसिद्ध कवी, गीतकार, पटकथा लेखक अरविंद जगताप यांच्या ऑनलाईन संवादाने झाले.

कववित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सदर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी मराठी चित्रपटांच्या आघाडीचे पटकथा लेखक अरविंद जगताप यांनी मुलींनी स्वत:चे जग निर्माण केले पाहिजे असे म्हटले. आपण जी भाषा बोलतो ती सर्वोत्कृष्ट असते. बहिणाबाई चौधरींनी आपली गाणी आपल्या भाषेत म्हटली, म्हणून ती लोकप्रिय झाली. कलावंत हा कुठे जन्माला आला यावरुन तो छोटा को मोठा ठरत नाही तर आपल्या भावना आपल्या भाषेतून तो किती समर्पक पध्दतीने गांडू शकतो आणि वाचणाऱ्यांच्या काळजाचा टव घेतो, त्यावरुन कलावंताची लोकप्रियता ठरत असते.

मुलीचे महाविद्यालय म्हणून मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनले पाहिजे. खरं पाहिलं तर अर्थकारण हे मुलींना लवकर कळते, नीटनेटकेपणा मुलींच्या अंगी जास्त असतो. घरातले प्रश्न तो अधिक जाणते. म्हणून गुलोंनी स्वत:चे जग निर्माण करुन आपल अस्तित्व अधोरेखित केले पाहिजे, हे सांगतांना चला हवा येवू दया या मालिकेतील पोस्टमन काका अर्थात सागर कारंडे जी तरल, डळवार, हळयो पत्र वाचतात त्यापैकी सोशिक बायांनो या पत्रातील काही उतारे स्वत: अरविंद जगताप यांनी सादर केलेत. पाण्याच्या घागरीचे ओझे डोक्यावर घेवून रोज पायपीट करणा-या बाया पाहिल्या को असं वाटतं बायांनीच आपले दिवस बदलबले पाहिजेत, एबहया वर्षातही धागरीचे ओझं अजून कमी झालं नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली.

महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. गौरी राणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कोरोना महामारीनंतर सर्व सुरळीत झाल्यावर अरविंद जगताप यांचा प्रत्यक्ष संवाद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी घडवून आगू असे आश्वस्थ केले.

या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्ररांचालन कला मंडळ प्रमुख, डॉ. सत्यजित साळवे यांनी केले, प्रा. नितीन इंगळे, श्री. राकेश वाणी, प्रा. दिपक किनगे, विद्याधर इंगळे यांनी तांत्रिक सहकार्य केले. यशस्वीतेसाठी विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर सहकारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content