चोपडा येथे असंघटित कामगार वर्गाचे तहसीलदारांना निवेदन

चोपडा प्रतिनिधी । लॉकडाऊन काळात तालुक्यातील असंघटिक कामगार, कापड दुकानावरील कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणीचे निवेदन येथील असंघटित कामगाराच्या वतीने तहसीलदार अनिला गावित यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, ‌संपूर्ण जगात तसेच भारतात कोरोना संसर्ग या विषाणूने थैमान घातले आहे त्या परिस्थितीत शासनाच्या वतीने २३ मार्च २०२० पासून लोक डाऊन (कलम १४४) लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत असंघटित कामगार कापड दुकानावरील रोजंदारी कर्मचारी, स्टेशनरी दुकानवरील रोजंदारी कर्मचारी अशा अनेक दुकानदार दुकानांवर काम करण्याऱ्या कर्मचारी हॉटेल वरील रोजंदारी कर्मचारी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सदरील कर्मचारी यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी, ही विनंती या असंघटित कामगार वर्ग चोपडा तालुका यांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी युवक संघ तालुका संपर्क प्रमुख समाधान प्रभाकर माळी, अल्केश महाजन, जितेंद्र महाजन, संदीप मराठे, भिकन माळी, भिकन राजपूत, संदीप मराठे, विजय माळी, योगेश पाटील, प्रदीप माळी, रमेश बारी, चेतन मराठे, भावेश मराठे, समाधान महाजन, राहुल लोहार, गोपाल पाटील, मयूर साळुंके, घनश्याम माळी, मोहन चौधरी, भोलेनाथ पाटील, सुनील मराठे, मोहित सैदाने इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content