जळगावात धर्मरथ फाऊंडेशनतर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा मास्क देवून सत्कार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील धर्मरथ फाऊंडेशनच्या वतीने शिवाजी नगरातील साफाई कामगार व युनिट प्रमुख आरोग्य विभाग कर्मचारी वर्गाचा आज मास्क व गुलापुष्प देवून सत्कार करण्यात आला.

शहरातील अतिशय दाटीवाटीचा परिसर असणारा शिवाजी नगर येथे धर्मरथ फाऊंडेशनच्या वतीने शिवाजी नगरातील सफाई कामगार व युनिट प्रमुख आरोग्य विभाग कर्मचारी वर्गाचा या बिकट समयी प्रतिकुल परिस्थितीत रोज-नित्यनेमाने सफाई करित नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवित काम करित असल्याची दखल घेत त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. पण यावेळी सोशल डिस्टंटिगचा नियम पाळत प्रत्येक सफाई कामगार (महिला व पुरुष) व कर्मचारी वर्गाला गुलाबपुष्प व मास्क वाटप करुन सत्कार करण्यात आला. यात महिला व पुरुष उपस्थित होते. या लॉकडाऊन वेळी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. सोशल डिस्टंटिग, क्लारंटाइन्ट या शब्दांची ओळख करुन देण्यात आली. मागील महिनाभरापासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवस-रात्र एक करणाऱ्या कर्मचारी वर्गाच्या आरोग्याच्या प्रश्न पुढे येऊ शकतो म्हणून आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला याप्रसंगी धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील यांनी दिला.

यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, राजेंद्र मराठे, उत्तम शिंदे, बाबू सपकाळे, दिनेश पुरोहित, संजय अकोलकर, आरोग्य अधिकारी शंकर दोबळे, रवींद्र बाविस्कर या प्रमुख मान्यवरांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Protected Content