यावल येथे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मार्गदर्शन बैठक

यावल प्रतिनिधी । येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत मान्यवरांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आणि पक्षाच्या धोरणाबाबत मार्गदर्शन केले.

दरम्यान यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यकर्ता बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. रवीन्द्र पाटील हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणुन योगेश देसले, सोपान पाटील, आ. मनिष जैन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मजहरभाई पठान, अॅड.ज्ञानेश्र्वर बोरसे, विजय प्रेमचंद पाटील, उमेश नेमाडे, रोहण सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रवादी धार्मिक आघाडीचे संभाजी पाटील, राष्ट्रवादी आदिवासी आघाडीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष एम.बी तडवी आदी मान्यवर पदाधिकारी या बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिर्निवाण दिनानिमित्ताने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भावपुर्ण आदरांजली वाहुन अभिवादन करण्यात आले. तसेच देशाच्या सिमेवर देशाचे रक्षण करतांना विरमरण पावलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वसर्वा खासदार शरद पवार यांच्या दि.१२ डिसेंबर २० रोजी संपुर्ण राज्यात साजरा होणाऱ्या ८० व्या वाढदिवसानिमित्ताने विविध समाजीक उपक्रम राबविणे, रक्तदान शिबीर, कोरोना विषाणुच्या काळात आपले जिव धोक्यात घालुन नागरीकांना आरोग्य सेवा बजावणाऱ्या विविध घटकांचे गौरव करणे, आगामी काळात होवु घातलेल्या ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विकास सोसायटीच्या निवडणुकी बाबत पक्षपातळीवर चर्चा करण्यात आली.

या कार्यकर्ता बैठकीची प्रस्तावना राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी मांडली. या बैठकीत भाजपातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणाऱ्या माजी नगराध्यक्ष अतुल पाटील तथा अन्य कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत जिल्हा अध्यक्ष अॅड. रवीन्द्र पाटील व आ. मनिष जैन यांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीत अॅड. रवीन्द्र पाटील, विलास पाटील, मनिष जैन, विजय पाटील, अतुल पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन तालुका युवक अध्यक्ष अॅड. देवकांत पाटील यांनी केले.

 

Protected Content