पुण्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी जळगाव महिला हॉकी संघाचा सहभाग

जळगाव प्रतिनिधी । पुणे येथे एसएनबीपी क्रीडा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय हॉकी महिलाच्या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील महिला हॉकी संघाला प्रवेश मिळाला आहे. संघाला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात महापौर जयश्री महाजन यांनी शुभेच्छा दिल्यात.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, रायसोनी एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व हॉकी जळगाव चे सचिव फारुक शेख यांची उपस्थिती होती.

महिला खेळाडूंना शुभेच्छा देताना महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले की, महिला या कोणत्याही क्षेत्रात मागे नसून ते आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे त्याला कारण स्वतःमधील आत्मविश्वास व संघर्षाची जिद्द असल्याने आपण आज बरोबरीत काम करीत आहोत जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच क्रीडांगणावर उतरा व जिंकून या असे भावनिक आव्हान सुद्धा त्यांनी खेळाडूंना केले.

हॉकी संघाचे सचिव फारूक शेख यांनी घोषित केली. यात भाग्यश्री कोळी, निशा कोंडाळकर, भाग्यश्री शिंपी, दिव्या शिंपी, सुनैना राजपाल, नूतन शेवाले, सायली खंडागळे, दीपिका सोनवणे, हिमाली बोरोले, सरला अस्वार, गायत्री अस्वार, रुपाली अस्वार, आरती ढगे, निकिता पवार, वैष्णवी चौधरी, अश्विनी वंडोळे, रोशनी राठोड, ममता नाईक प्रशिक्षक म्हणून लियाक़त अली सैयद तर व्यवस्थापक म्हणून सत्यनारायण पवार व सह व्यवस्थापक म्हणून हिमाली बोरोले यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षक लियाकत अली सय्यद तर आभार संघाच्या  सहव्यवस्थापिका हिमाली बोरले यांनी केले.

 

Protected Content