Home Cities एरंडोल नागदुली येथील अल्पवयीन मुलीला पळविले

नागदुली येथील अल्पवयीन मुलीला पळविले

0
32

एरंडोल प्रतिनिधी । म्हसावद येथील आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यास जाते असे सांगून बाजारात गेलेली १४ वर्षीय मुलगी बाजारातून बेपत्ता झाली आहे. तिला पळवून नेण्यात आले असल्याची तक्रार पित्याने एरंडोल पोलीस स्टेशनला केलेली आहे. 

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला भाग ५  गुन्हा  रजिस्ट्रेशन नंबर ८८/२० भादवि ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील राजू पाटील, संदीप सातपुते पुढील तपास करीत आहेत.

 

 


Protected Content

Play sound