Home Cities एरंडोल एरंडोल येथे महामानवास अभिवादन

एरंडोल येथे महामानवास अभिवादन

0
39


एरंडोल प्रतिनिधी । शहरातील विखरण रोड येथील श्रावस्ती पार्क येथे नुकताच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

या कार्यक्रमाचे आयोजन श्रावस्ती पार्क कार्यक्रम समिती मार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना व बुद्ध पूजा सामूहिकरित्या घेण्यात आली. चिंतामण जाधव सर, व्हि.डी. ब्रम्हे, वर्षा शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विमलबाई सावळे यांनी भीम गीते सादर केली. त्यानंतर बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे महाराष्ट्राचे सचिव प्राध्यापक भरत शिरसाठ यांचे व्याख्यान संपन्न झाले. श्रावस्ती पार्कमधील समाजबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound