भरधाव ॲपेरिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरा जवळील रायसोनी कॉलेजच्या समोर रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ॲपे रीक्षाने दुचाकीला जोरदार दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना गुरूवार १४ डिसेंबर रेाजी  सकाळी साडेसात वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ॲपे रिक्षाचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर देवाजी चौधरी (वय-२२ रा. अयोध्या नगर जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता ते रायसोनी कॉलेज जवळून जळगावकडे दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएक्स ३४३०) ने येत असताना समोरून येणाऱ्या अज्ञात ॲपेरिक्षा ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार किशोर चौधरी हे जखमी झाले. अपघात घडल्यानंतर ॲपे रिक्षा चालक  हा वाहन घेऊन पसार झाला होता. दरम्यान जखमी झालेल्या दुचाकीस्वार किशोर चौधरी यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. शनिवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ११  वाजता त्यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात ॲपे रिक्षाचालका विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहे.

Protected Content