समोरासमोर दोन दुचाकी अपघातात तरूण जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता घडली होती. याप्रकरणी शनिवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता धडक देणाऱ्या अज्ञात दुचाकी धारकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सायसिंग कतिया सोयंकी (वय-४०, रा. बडवाणी मध्यप्रदेश ह.मु. धरणगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ४  डिसेंबर रोजी सायंकाळी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास  सायसिंग सोयंकी हा त्याची दुचाकी (एमपी ४६ एमएन ९९४५) ने धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरून जात असताना समोरून येणारी दुचाकी (एमएच ४३ एआर ३७२५) यावरील अज्ञात दुचाकीधारकाने जोरदार धडक दिली. या धडकेत सायसिंग सोयंकी यांच्या तोंडाला नाकाला गंभीर दुखापत झाली.  त्यांना तातडीने जवळच असलेल्या धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांनी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर अखेर शनिवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता सायसिंग सोयंकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीधारका विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहे.

Protected Content