जळगावात चिमुकलीशी अश्लिल चाळे; एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी ४ वर्षीय चिमुकलीशी अश्लिल चाळे करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला शनीपेठ पोलीसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार वर्षीय मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. त्यांच्या ओळखीचा अमोल हरीष जोशी (वय-२१) रा. शनिमंदीर परिसर शनीपेठ याने चार वर्षाच्या चिमुकलीला मोबाईल खेळण्याचा बहाणा करून तिला उचलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत चिमुकलीच्या आईच्या हा प्रकार लक्षात आला. हा प्रकार ९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. पिडीत चिमुकलीच्या आईने संशयित आरोपी अमोल जोशी यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी अमोल जोशी याला अटक केली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे. 

Protected Content