महिलेच्या शरीरात कोरोनाचे दोन वेरिएंटस

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । बेल्जियममधील एका महिलेच्या शरीरात कोरोना विषाणू संसर्गाचे दोन वेरिएंट आढळून आले आणि महिलेचा पुढील पाच दिवसात मृत्यू देखील झाला. 

 

कोरोना संसर्गाचं हे प्रकरण समोर आल्यानंतर शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. एका महिलेच्या शरीरात दोन प्रकारचे वेरिएंट समोर आल्यानंतर कोरोनाचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

 

90 वर्षीय महिलेच्या शरीरात एकाच वेळी अल्फा आणि बीटा वेरीएंट आढळून आले. संबंधित महिलेनं कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती. ती घरीच राहून कोरोनावरील उपचार घेत होती . महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिला मार्च महिन्यात ओएलवी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 

 

महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिची कोरोना चाचणी करण्यात आली त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सुरुवातीला महिलेच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली दिसून येत होती. मात्र, नंतरच्या काळात तिची पकृती बिघडत गेली आणि पाचव्या दिवशी तिचा मृत्यू झाला. बेल्जियममधील महिलेच्या मृत्यूचं प्रकरण समोर आल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस घेणं किती गरजेचं आहे हे समोर आलं आहे. रुग्णालय प्रशासनानं त्या महिलेला कोरोनाच्या कोणत्या वेरिएंटचा संसर्ग झाला होता याचा शोध घेतला असता तिच्या शरीरा अल्फा आणि बिटा वेरिएंट आढळून आले. अल्फा वेरिएंट हा सर्वप्रथम ब्रिटनमध्ये तर बिटा वेरिएंट दक्षिण आफ्रिकेत समोर आला होता. वैज्ञानिकांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

 

ओएलवी रुग्णालयातील मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट आणि ऐनी वेंकीरबर्गन यांनी संबंधित महिला रुग्णालायत दाखल झाली होती त्यावेळी बेल्जियममध्ये दोन्ही वेरिएंटच्या लाटेचा प्रादुर्भाव होता, असं सांगितलं. त्या महिलेला दोन वेरिएंटचा संसर्ग वेगवेगळ्या व्यक्तींकडून झाला असू शकतो, असं देखील त्यांनी म्हटलं.ओएलवी रुग्णालयानं अधिक तपासासाठी नमुने युरोपियन काँग्रेस ऑफ क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शियस डिसीजकडे पाठवले आहेत.

 

जानेवारी महिन्यात ब्राझीलच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या देशात एकाच वेळी अनेक रुग्णांना कोरोनाच्या दोन्ही वेरिएंटचा संसर्ग झाल्याची प्रकरण समोर आल्याचा दावा केला होता. वेंकीरबर्गन यांनी अशा प्रकारची प्रकरण यापूर्वी नजरअंदाज करण्यात आली असल्याचंही म्हटलं. वेंकीरबर्गन यांनी वेरिएंटस ऑफ कंसर्नच्या टेस्टीगंच्या मर्यादा आहेत. वेरिएंटसचं म्युटेशन ओळखण्यासाठी जिनोम सिक्वेंन्सिंगद्वारे ओळखण्यात येते, असंही त्यांनी सांगितलं. तर विषाणूतज्ज्ञ लॉरेस यंग यांनी एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एका पेक्षा अधिक वेरिएंट आढळनं आश्चर्यकारक नसल्याचं म्हटलं आहे.

 

Protected Content