नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी संबंध : अडचणीत वाढ होण्याची शक्यता

 मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | आर्थिक गैरव्यवहार ‘मनी लॉण्ड्रींग’प्रकरणी राष्ट्रवादीचे मंत्री मलिक यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

‘मनी लॉण्ड्रींग’प्रकरणी राष्ट्रवादीचे बिनखात्याचे मंत्री मलिक हे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)केलेल्या कारवाईतून अटकेत आहेत.  हसिना पारकर, सलिम पटेल आणि सरदार शाहवली खान यांच्या समन्वयातून  मुनीरा प्लंबरची जमीन बळकावली. त्यातून मिळणारे उत्पन्न हे बेकायदेशीर कृत्यांमधून प्राप्त केले आहे, त्यामुळे मलिक यांच्याविरोधात “मनी लाँण्ड्रींग’ विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार शाहवली खान औरंगाबाद कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या शाहवली खानची मदत  गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरूंचा सर्व्हे करीत सर्व्हेअरशी समन्वय साधण्यासाठी घेतली. नवाब मलिक, अस्लम मलिक आणि हसीना पारकर यांच्यात झालेल्या बैठकांमध्ये शाहवली खान पॅरोलवर तुरुंगाबाहेर असताना उपस्थित होता, असेहि आरोपपत्रात नमूद आहे. आरोपी हा सर्व माहिती असूनही मनी लाँण्ड्रींगमध्ये सहभागी आहे. त्यामुळे पीएमएलए अंतर्गत मनी लॉण्ड्रींगचा गुन्ह्यात दोषी असून तो शिक्षेस पात्र ठरतो, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले आहे.  राष्ट्रवादीचे मंत्री मलिक आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी सरदार शाहवली खान यांच्याविरोधात पुढील कारवाई करण्यास परवानगी दिली आहे.

Protected Content