जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील दुचाकी चोर हा जळगाव शहरात येवून महागड्या किंमतीची दुचाकी चोरून नेत होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीस जामनेर तालुक्यातील अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, रॉकेश राजु चौधरी (वय – २५ रा. गोंधळीपुरा, शेंदुर्णी ता. जामनेर) हा जळगाव शहरात येऊन मोटरसायकल चोरी करीत होता. त्यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला भाग-५ गुरनं १५०/२०१९ भादवि ३७९ गुन्हा दाखल होता. संशयित आरोपी १७ ऑगस्ट रोजी शहरात येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ. अशोक महाजन, पोहेकॉ सुनील दामोदरे, पोकॉ विजय पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, नंदलाल पाटील, दिपक शिंदे, अरूण वंजारी यांनी पंचमुखी हनुमान चौकात रॉकेशला अटक करण्यात आली. पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.