वाघोदा अपघातातील ट्रक चालकाचे अखेर ३० तासानंतर शवविच्छेदन

truck accident

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील वाघोदा गावाजवळच्या झालेल्या अपघातातील मरण पावलेल्या ट्रक चालकाचे अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर आज (दि.१३) शवविच्छेदन करण्यात येवुन मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे.

store advt

अधिक माहिती अशी की, येथून अवघ्या नऊ किलोमीटर लांब असलेल्या बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील वाघोदा गावाजवळ असलेल्या धोकादायक पुलावरून ट्रक खाली पडून झालेल्या अपघातात मरण पावलेल्या सामतभाई कान्हाभाई कटेशिया यांचा मृतदेह गेल्या ३० तासांपासुन येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनगृहात पडून होता. आज मृताचे मोठे भाऊ भिकाभाई कान्हाभाई कटेशिया व गोविंदभाई कान्हाभाई कटेशीया व मित्र दिनेशभाई डांगर राहणार खडकाना, जिल्हा राजकोट, गुजरात हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांनी शवविच्छेदन करून सामतभाई यांचा मृतदेह त्यांना सोपवला. सामतभाई यांच्या मागे पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. याबाबत पोलिसात वना रामा भालेराव रा. साकळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

धोकादायक वळण :- दरम्यान वाघोदा गावाजवळ चुकीच्या पद्धतीने बांधला गेलेला दुहेरी पुल हा अत्यंत धोकादायक ठरत असुन, सार्वजनीक बांधकाम विभागाने या अपघात पॉईंट बनलेल्या पुलाच्या दोन्ही बाजुस तात्काळ गतीरोधक बसवुन रस्त्याच्या कडेला असलेली झुडपे कमी करावी व धोक्याचे वळण म्हणुन पुलाच्या दोघा साईडला फलक लावण्यात यावे, अशी मागणी वाहकांकडुन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!