वहिवाटीसाठी रस्ता न मिळाल्यास आमरण उपोषण- शेतकरी संघर्ष संघटनेचा इशारा(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील मौजे सनपुले येथील दलित वस्तीला वडिलोपार्जीत असलेला उत्तर-दक्षिण रस्ता वहिवाटसाठी वापरण्यास मिळावा अन्यथा आमरण उपोषण पुकारले जाईल असा इशारा शेतकरी संघर्ष संघटनेचे चोपडा तालुका अध्यक्ष समधान युवराज बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, ग्रामपंचायत सनपुले ता. चोपडा येथील दलित सुधार योजनेतील ट्रिमिक्स काँक्रीटकरण दलित वस्तीत सुरू आहे. ते काम अर्धवट बंद करण्यात आले आहे. पूर्वी हा रस्ता दलित वस्तीतून गाव विहिर पाणी भरण्यासाठी तसेच सार्वजनिक शौचालय, स्मशान भूमी, व नदी वर जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होत असे. या रस्त्याला लागून एक मुख्य रस्ता असून कालांतराने दलित वस्तीतील रस्ता या मुख्य रस्त्याकडे सोयीनुसार मध्येच ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काचा जागेतून मध्येच वळवण्यात आला आहे. यापूर्वी या रस्त्यावर काँक्रिटीकरण देखील झाले आहे. पण आज त्याच रस्त्यावर दलित वस्ती काँक्रिटीकरण चालू असून ते मध्येच बंद करण्यात आले. ज्या ठिकाणी दलित वस्तीतील रस्ता मुख्य रस्त्याकडे वळवण्यात आला आहे त्या ठिकाणी मुरलीधर तुकाराम पाटील यांचा प्लॉट असल्यामुळे त्यांनी पुढील रस्ता बनवण्यात येऊ नये म्हणून काम बंद करण्यात आले आहे. सदर ज्या प्लॉटधारकाने जुने मूळ मालकाने प्लॉट विक्री केलेला होता त्यांना मूळ रस्ता माहित आहे त्यांनी तसे सांगितले असता नव्या प्लॉट मालकाने हि बाब मान्य केलेली नाही. सदर प्लॉटचा अर्धा हिस्सा आलेले प्लॉट मालक रतिलाल संतोष बाविस्कर व उत्तम बाविस्कर हे रस्ता द्यायला तयार असून उर्वरित प्लॉटधारक पुढील रस्ता देण्यास तयार नसून आडमुठेपणा करीत आहे. सदर होऊन आम्ही सरपंच व तसेच ग्रामसेवक यांना घटनास्थळी बोलावून दलित वस्तीचे काम पूर्ण करण्याची विनंती केली. तरी काही तोडगा निघाला नसल्यामुळे सरपंच व तसेच ग्रामसेवक यांनाही एक लेखी अर्ज दिला आहे. तरी आपण पण या कामाची दखल घ्यावी व आम्हा दलितबांधवांना न्याय मिळवून द्यावा.जर आपण न्याय मिळवून न दिल्यास शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील व कार्याध्यक्ष नानासाहेब बच्छाव तसेच गावातील दलित बांधव हे आमरण उपोषणास बसतील आणि होणाऱ्या परिणामास सनपुले ग्रामपंचायत कारणीभूत असले.तरी आपण तात्काळ आमच्या ग्रामसेवक व सरपंच यांना आदेशीत करावे आणि आमच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव उपोषणास बसावे लागेल. निवेदनावर रतिलाल बाविस्कर, विजय बाविस्कर, वासुदेव बाविस्कर, उत्तम बाविस्कर, दगडू बाविस्कर, आनंदा बाविस्कर, मालुबाई बाविस्कर, आशाबाई बाविस्कर, वैशाली बाविस्कर आदींची स्वाक्षरी आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1145991642813168

 

Protected Content