हरीविठ्ठल नगरात प्रौढाच्या डोक्यात घातला लाकडी दांडका; तीन जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । घराचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून एका ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तीला तीन जणांनी लाकडी फावड्याच्या दांड्याने बेदम मारहाण करून जीवेठार मरण्याची धमकी दिली. ही घटना हरीविठ्ठल नगरातील मराठी शाळेजवळ रविवार १६ मे रोजी रात्री ८ वाजता घडली. चौकशीअंती दोन दिवसांनी आज मंगळवारी सकाळी तीन जणांवर रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, शिवाजी दयाराम पाटील (वय-५५) रा. मराठी शाळेजवळ, हरीविठ्ठल नगर हे आपल्या परिवारासह राहतात. १६ मे रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास शिवाजी पाटील यांच्या घराचा वीज पुरवठा खंडीत झाल्याबाबत गल्लीतील अजय दिलीप कोळी याला रागवले. याचा राग आल्याने अजय कोळी, सोनू दिलीप कोळी आणि दिलीप कोळी रा. हरीविठ्ठल नगर यांनी शिवाजी पाटील यांना शिवीगाळ केली तर लोखंडी फावड्याच्या दांड्याने बेदम मारहाण केली. यात शिवाजी पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीन खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. चौकशी अंती आज मंगळवारी सकाळी शिवाजी पाटील  यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल पाटील करीत आहे. 

Protected Content