शाहूनगरात दोन गटात तुंबळ हाणामारी; तीन जखमी, १० जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहू नगर येथे दोन गटात किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. यात एकावर धारदार शस्त्राने वार केले आहे. यात तीन जण जखमी झाले आहे. शहर पोलीसात परस्पर विरोधात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पहिल्या गटातील फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील शाहू नगरात राहणाऱ्या नासीर खान बाशीर खान (वय-३५) व त्याचा भाऊ साजीद खान बशीर खान हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबियांसह राहतात.  १६ मे रोजी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या दरम्यान घरासमोरील ओट्यावर बसले होते. त्यावेळी गल्लीतील चिराग (पुणे नाव माहित नाही ) याने कचरा गटारीत टाकला. हे पाहून ‘गटारीत कचरा का टाकला’ असा जाब नासीर खानने विचारल्याने चिराग, तौसीफ, अरशद, बाशीर आणि शोएब (पुर्ण नाव माहित नाही) यांनी शिवीगाळ व मारहाण केली. फिर्यादीच्या डाव्या कानावर धारदार शस्त्राने वार केले तर सादीद खान यांच्या डोक्यावर तलवारीने वार केले. नासीर खानच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शकीला बानो शेख चिरागउद्दीन (वय-५२) रा. शाहू नगर यांच्या फिर्यादीनुसार नासीर शेख मुशीर हा शाकीला बानो यांच्याकडे का पाहतो. याचा जाब विचारला असता. नासीरने अश्लिल शिवीगाळ केली व लोखंडी पाईप डोक्यावर मारले. त्यात ते जखमी झाले. इतर कादीर, साजीद, मुल्ला इमरान आणि शाकीर (पुर्ण नाव माहित नाही)यांनी महिलेच्या मुलांना बेदम मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र परदेशी करीत आहे. 

Protected Content