चोपडा येथील रस्त्याच्या पेव्हर्स कामाबाबत तक्रार

Chopda News

चोपडा (प्रतिनिधी)। शहरातील बाजारपेठ रस्त्यावर कोणत्याही तांत्रिक बाबींची पुर्तता न करताचा पेवर्स लावण्याचा घाट मागील महीन्यापासून सुरू आहे. मात्र आज ज्यास्थितीत काम केले ते अपुर्ण आणि सांडपाण्याचा कोणताही निचरा होत नाही. वारंवार तक्रार देवून याकडे दुर्लक्ष दिल्याने सुशिल टाटिया यांनी नगरपरिषदला न्यायालयामार्फत नोटीस दिली आहे.

चोपडा बाजारपेठेच्या रस्त्यावर कोणत्याही तांत्रिक बाबींची पूर्तता न करताच पेवर्स लावण्याचा उपद्व्याप मागील महिनाभर सुरु आहे. रस्ता न खोदताच पेवर लावल्यामुळे रस्त्याची उंची सुमारे ८ इंचने वाढली आहे. भोंगळपणाचा कळस म्हणजे गटारींवरील ढापे व सांडपाण्यासाठी असलेले होल ठेकेदाराने वारंवार सांगितल्यानंतर ही बुजून टाकले आहेत. नगरपरिषदतर्फे मुख्याधिकारी, इंजिनिअर, नगराध्यक्ष किंवा कुणीही सत्तेत असलेले जबाबदार अधिकारी एवढ्या दिवसात फिरकलेले नाहीत. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जीवनभाऊ चौधरी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सदर बाबतीत ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली खरी परंतु चुकीच्या पद्धतीने होत असलेले काम थांबविण्यासाठी अधिकार असतांना काहीही पाऊल उचलले असे निदर्शनास आले नाही. उलट त्यानंतरच्या कामातही ढापे पेवर खाली पुरुन टाकलेले दिसत आहेत. आता कचराने तुडुंब भरलेल्या गटारी कशा साफ होतील आणिसांडपाणी पावसाचे पाणी गटारीत कसे जाईल? याचे उत्तर कुणाकडेही नाही किंवा कुणालाही त्याची तमा नाही. रस्त्यावरील पाणी वाट न मिळाल्याने दुकानांमधे शिरुन आतोनात नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. सबब परिसरातील दुकानदारांनी वेळीच खबरदारीचे उपाय करून नगर परिषदेच्या या बेजबाबदार कारभाराचा उघड विरोध करावा ही विनंती. नागरिकांना मूलभूत सोयी पुरविण्या ऐवजी जनतेसमोर गंभीर समस्या निर्माण करणाऱ्या नगर परिषद प्रशासन विरोधात दाद मागण्यासाठी कोर्टात जाण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागत आहे.

Add Comment

Protected Content