चोपडा कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्र विषयावर व्याख्यान

chopada 1

चोपडा प्रतिनिधी । येथील म.गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 11 वी विज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्या विज्ञान समितीचे सदस्य व चोपडा वरिष्ठ महाविद्यालयातील प्राणीशास्र विभागप्रमुख प्रा.डॉ.पी.एस.लोहार यांचे ‘जीवशास्त्र विषयाची तयारी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रा.डॉ.पी.एस.लोहार यांनी आपल्या व्याख्यानात पुस्तक लेखन करतांनाचे अनुभव, त्यासाठी घ्यावे लागणारे परिश्रम, जीवशास्त्र पुस्तकातील एकूण 16 प्रकरणांतील ठळक बाबींचे विश्लेषण दृकश्राव्य माध्यमाद्वारे करुन वैद्यकीय अभ्यास, फार्मसी प्रवेशाच्या एम्स, नीट, सीईटी परीक्षांच्या तयारीसाठी पुस्तक हे उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढे म्हणाले की, बोर्ड परीक्षा व प्रवेश परीक्षेच्या तयारी कशी करावी, आणि यावर काही टिप्सही विद्यार्थ्यांना दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.एस.हळपे उपस्थित होते. प्रास्तविक पर्यवेक्षक व्ही.वाय.पाटील यांनी केले. परिचय आर.ई. लांडगे यांनी करुन दिला. व्याख्यानासाठी शिक्षकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली पाटील यांनी तर आभारप्रदर्शन राजश्री निकम यांनी मानले आहे.

Protected Content