चोपडा येथील बालमोहन विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

चोपडा प्रतिनिधी । राज्यात आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्या आहेत. विद्यालयातील प्रत्येक वर्ग, कार्यालयाचा परिसर निर्जंतूक करण्यात आला. पहिल्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पुस्तक देवून स्वागत करण्यात आले. 

शहरातील बालमोहन विद्यालयात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी अमर संस्थेचे व्यवस्थापक मुकेश चौधरी, मुख्याध्यापक प्रदीप चौधरी,शिक्षक बंधु,भगिनी उपस्थित होते. शिक्षकांनी प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेतला ,वातावरण आनंदी दिसले.सोशल डिस्टनसिंगचे पालन करत,मास्क लावून विद्यार्थी, शिक्षक हजर होते.  

 

Protected Content