राज्यपाल आले नाहीत हे बरेच झाले ! – देवेंद्र मराठे

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठामध्ये  आज दि. १९  डिसेंबर रोजी आयोजित आव्हान शिबिरासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी येणार होते. याप्रसंगी राज्यपालांचा जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने एक अनोख्या पद्धतीने सत्कार करून निषेध व्यक्त केला जाणार असल्यानेच त्यांचा दौरा रद्द झाल्याचे जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

जिल्हा युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाचा आशय असा की,  अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीज्योती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमान जनक बेताल वक्तव्य करणारे भगतसिंग कोषारी हे जिल्हा दौऱ्यावर येत होते. ज्या थोर महापुरुषांच्या इतिहास आजही वाचून आजचा तरुण मोठा होतो, अशा महापुरुषांबद्दल गरड ओकणाऱ्या राज्यपालांचा जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने एक अनोख्या पद्धतीने सत्कार करून निषेध व्यक्त केला जाणार होता. परंतु जळगाव जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या वतीने आपला होणाऱ्या सत्काराला घाबरून राज्यपाल महोदयांनी आपला जिल्हा दौरा रद्द करत आव्हान शिबिर या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थिती दिल्याचे कळाले.  राज्यपाल हे संविधानिक पद आहे. राज्यपाल या पदाला  कदापी आमचा विरोध नाही परंतु त्या पदावर ती बसलेली व्यक्ती ही थोर महापुरुषांचा अपमान करणारे बेताल वक्तव्य करणारे विकृत मानसिकतेचा व्यक्ती असून ती व्यक्ती  विद्यापीठात न येणे म्हणजेच विद्यापीठाची पवित्रता शाबूत राखल्या गेली व संपूर्ण जळगाव नगरी अपवित्र होण्यापासून वाचली असे मत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी व्यक्त केले.

 

Protected Content