रावेर शौचालय घोटाळा : अटकेतील संशयितांना न्यायालयीन कोठडी

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पंचायत पंचायत समितीत वयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात तात्कालिन गटविकास अधिकारी यांचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

रावेर पंचायत समितीच्या वयक्तीक शौचालया घोटाळ्यात रावेरचे तत्कालिन गट विकास अधिकारी हबीब तडवी यांचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याची माहिती तपास अधिकारी शितल कुमार नाईक यांनी दिली आहे. पोलीसांनी दोन वेळा त्यांच्या घरी शोध घेतला परंतून अद्याप कुठेही माहिती मिळाली नाही. त्यांचा मोबाइल देखिल बंद असल्याचे दिसून आले आहे.

या प्रकरणात रावेर पंचायत समितीकडून महत्वाची माहिती मागविली जात आहे. यात अनुदानाचा वारंवार लाभ घेणारे लाभार्थी आमच्या रडारवर असल्याचे तपास अधिकारी शितल कुमार नाईक यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.