दुचाकींची समोरा-समोर धडक : दोन तरूण ठार

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ दोन दुचाकींची समोरा-समोर जोरदार धडक झाली असून यात दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, काल रात्री साडेसातच्या सुमारास मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या जवळ दोन दुचाकींची समोरा-समोर जोरदार टक्कर झाली. यात एका दुचाकीवरील अंदाजे ३० वर्षांचा तरूण जागीच ठार झाला. तर धीरज शशिकांत चौधरी (वय२४, रा. आमोदा, ता. यावल) हा गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमी धीरज याला पहिल्यांदा फैजपुरात प्रथमोपचार करून जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांनाच रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला.

दरम्यान, अपघातात घटनास्थळी ठार झालेल्या पहिल्या इसमाची ओळख ही रात्री उशीरापर्यंत समजू शकली नव्हती. तर या संदर्भात पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content