कापडी बॅगमधील चार लाखांची रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील एका व्यापार्‍याने कापडी बॅगमध्ये ठेवलेली चार लाख रूपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार घडला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, संतोष हुकुमतमल राजपाल (वय ४५, रा. जळगाव) हे होलसेल व्यापारी आहेत. काल रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास ते आपले बंधू खेमचंद राजपाल यांच्या अशोक टॉकीज गल्लीतील जय अंबे इलेक्ट्रीक या दुकानाच्या ठिकाणी आले होते. याप्रसंगी त्यांनी आपल्या मोपेडवरील कापडी थैलीत चार लाख रूपयांची रोकड ठेवलेली होती.

दरम्यान, दोन भामट्यांनी ही कापडाची पिशवी लंपास करून तेथून पोबारा केला. या प्रकरणी संतोष राजपाल यांनी जळगाव शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून यावरून भादंवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखाली निरिक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे करत आहेत.

Protected Content