निवासी उपजिल्हाधिकारी हल्ला प्रकरणातील दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून तरसोद गावाजवळ निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळूमाफियांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या गुन्ह्यातील १६ जणांना अटक करण्यात आली असून त्याच्यावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अटकेतील दोन संशयितांची १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायमुर्ती श्रीमती एम.एम.बडे यांनी दिले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे हे तरसोद फाट्याजवळ मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास वाळूचे डंपरवर कारवाई करण्यासाठी गेले असतांना अचानक त्यांच्यावर वाळूमाफियांकडून जीवघेणा हल्ला चढविण्यात आला. या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड टाकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर मारेकरी फरार झाले होते. यातील गौतम यशवंत पानपाटील वय ३८ रा. सावखेडा ता.जि.जळगाव आणि विठ्ठल भगवान पाटील वय-३६ रा. ज्ञानदेव नगर, जळगाव यांच्यासह इतर असे एकुण १६ जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान संशयित आरोपी गौतम पानपाटील आणि विठ्ठल पाटील यांची सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती श्रीमती एम.एम.बडे यांनी दोघांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content