अष्टभूजा देवीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कलश यात्रा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट परिसरात कालंका मित्र मंडळ व महिला मंडळातर्फे असलेल्या मंदिरात अष्टभूजा मातेच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवार १२ फेब्रुवारी रोजी कलशयात्रा काढण्यात आली. यावेळी परिसरातील भाविक शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहरातील कालंका मित्र व महिला मंडळातर्फे त्या परिसरात असलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर याठिकाणी असलेल्या हनुमंतरायाच्या मुर्तीसह अष्टभुजा माता, गणपतीसह महादेवाची देखील स्थापना केली जात आहे. त्यानिमत्त १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभयात्रेमध्ये महिलांनी पारंपारिक वेशभूषेसह फेटे परिधान करुन डोक्यावर कलश घेवून शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी माजी नगरसेवक किशोर बाविस्कर, विशाल भोळे, हिरालाल वाणी, रमेश चौधरी, संजय कासार, भगवान चौधरी, भगवान मदाने, भालचंद्र व्यवहारे, सचिन चौधरी, सतिष चौधरी, मधुकर चौधरी, दिलीप सावळे, विजय सोनवणे, किरण वाणी, उमेश चौधरी, मधुकर बारी, विशाल चौधरी, चेतन चौधरी, वैभव चौधरी, सोमेश चौधरी, प्रसाद कासार, मोहीत सोनवणे, मानव चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीन दिवसीय सुरु असलेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये १३ फेब्रुवारी रोजी नवचंडी यज्ञासह मुर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी महाआरती होवून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अष्टभूजा मातेच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी कालंका महिला मंडळाने पुढाकार घेत मंदिराचा जिर्णोद्धार करुन मंदिरात अष्टभूजा माता, महादेव व गणरायाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. या मंडळांकडून परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते. यामध्ये मिनाक्षी सावळे, लिलाबाई चौधरी, शैला पाटील, संगिता चौधरी, उषाबाई चौधरी, सुनंदा चौधरी, वंदना कासार, मंगला मिस्तरी, सारिका चौधरी, पुजा चौधरी, लक्ष्मी व्यवहारे यांच्यासह महिलांचा सहभाग आहे.

Protected Content