सफाई कामगारांना न्याय्य हक्क हवेत-डॉ. बहनवाल (व्हिडिओ)

 

जळगाव राहूल शिरसाळे । सफाई कामगारांना सुट्यांसह त्यांचे हक्क मिळावेत अशा मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीच्या सहसंयोजक डॉ. रेखा बहनवाल या प्रयत्नशील आहेत. आज त्यांनी जळगाव महापालिकेला भेट देऊन सफाई कामगारांना त्यांचे हक्क द्यावेत अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. याप्रसंगी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, दीप्ती चिरमाडे उपस्थित होते.

डॉ. रेखा बहनवाल यांनी जळगाव जिल्ह्याला भेट देऊन विविध शासकीय व प्रशसकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. यात त्यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त देशमुख यांचाही समवेश आहे. डॉ. बहनवाल यांनी दोन वर्षांपूर्वी महापालिकेत बैठक घेऊन विविध सूचना केल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.. सफाई कर्मचारी व डोक्यावर मैल घेऊन जाणाऱ्यांसाठी काम करणारे जळगावचे स्वातंत्र्यसैनिक, मेहतर समाजाचे पहिले आमदार भगवान बुधा कंडारे यांच्या नावाने जळगावात स्मारक उभारावे, पुलाला त्यांचे नाव देण्यात यावे याबाबतचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी महापौर,आयुक्त, त्या भागातील नगरसेवक यांना दिला होता. पाठपुरावा केला तर अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या बैठकीत केलेल्या सुचनांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशी शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आयुक्तांना केली आहे. याप्रसंगी कुमार एन. सिरामे, विशाल त्रिपाठी, संदीप पाटील, आशा राजपूत, उज्ज्वला पवार, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/724140951860489

Protected Content